दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
दुष्काळी महाराष्ट्राला हिरवे स्वप्न देणारा – शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, जनतेचा खरा सेवक
१ जुलै १९१३ : वसंतराव नाईक यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पुसदजवळील गहुली गावात जन्म.
१९३३ : वसंतराव नाईक नागपूर येथील निलसिटी हायस्कूलमधून मॅट्रिक झाले.
१९३७ : वसंतराव नाईक यांनी मॉरिस कॉलेजमधून बी.ए. पूर्ण केले.
१९४० : वसंतराव नाईक यांनी नागपूरच्या विधी महाविद्यालयातून एल.एल.बी. पदवी घेतली.
१९४१ : वसंतराव नाईक यांनी पुसद येथे स्वतंत्र वकिली सुरू केली.
६ जुलै १९४१ : वसंतराव नाईक यांचा वत्सला घाटे यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.
१९४२ : 'भारत छोडो' आंदोलनात सहभाग आणि खादीचे कपडे घालण्यास सुरुवात.
ऑक्टोबर १९४६ - जानेवारी १९५२ : पुसदचे नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड.
३१ ऑगस्ट १९५२ : इंग्रजांनी बंजारा समाजावर लादलेला 'गुन्हेगार जमातीचा काळा कायदा' वसंतराव नाईक आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या प्रयत्नांनी रद्द.
१९५२ : पहिल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत वाशिम मतदारसंघातून विजयी आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नियुक्ती.
२१ जानेवारी १९५३ : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे 'ऑल इंडिया बंजारा सेवा संघा'ची स्थापना.
२९ डिसेंबर १९५३ : राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना.
१ नोव्हेंबर १९५६ : गुजरात आणि महाराष्ट्राचे मिळून ‘विशाल द्विभाषिक राज्य’ निर्माण झाले; वसंतराव नाईक यांची नव्या राज्याचे सहकार मंत्री म्हणून नियुक्ती.
१९५७ : द्विभाषिक मुंबई राज्याच्या निवडणुकीत पुसद मतदारसंघातून विजयी; यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून नियुक्ती.
१९६० : महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि वसंतराव नाईक यांची महसूल मंत्री म्हणून नियुक्ती (१ मे १९६० ते ४ डिसेंबर १९६३).
१९६१ : सत्तेचे विकेंद्रीकरण; नाईक समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा तयार झाला.
१९६२ : महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापन झाल्या.
१९६३ : 'कमाल जमीन धारणा कायदा' (सीलिंग कायदा) महाराष्ट्रात अस्तित्वात आला.
५ डिसेंबर १९६३ : वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली (जवळपास साडेअकरा वर्षांचा दीर्घकाळ कार्यकाळ सुरू).
१४ फेब्रुवारी १९६४ : मराठी ही सरकारी कामकाजाची भाषा असावी असा निर्णय.
१८ ऑक्टोबर १९६५ : पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते जायकवाडी धरणाचा पाया रचण्यात आला.
१९६७ : दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९७२ पर्यंत).
१९६८ : भुसावळ औष्णिक वीज केंद्रांची स्थापना.
१९६८ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीची स्थापना.
१९६९ : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाची स्थापना.
१९६९ : भीमा नदीवरील उजनी प्रकल्पाची मुहूर्तमेढ.
१७ मार्च १९७० : सिडकोची (City and Industrial Development Corporation) स्थापना.
१९७१ : 'न्यू बॉम्बे' (सध्याचे नवी मुंबई) विकसित करण्याचे काम सुरू झाले.
१९७१ : कापूस एकाधिकार योजना सुरू.
१९७२ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीची स्थापना.
१९७२ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीची स्थापना.
१९७२ : रोजगार हमी योजना सुरू झाली (महाराष्ट्र हे अशी योजना सुरू करणारे पहिले राज्य).
१९७२ : तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१६ मार्च १९७२).
१९७२ : सिडकोने औरंगाबाद शहरात टाउनशिप विकसित करण्याचे काम हाती घेतले.
१९७४ : कोराडी येथे औष्णिक वीज केंद्रांची स्थापना.
१९७५ : विरोधकांच्या दबावामुळे वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
१९७६ : जायकवाडी प्रकल्पाचे लोकार्पण.
मार्च १९७७ : आणीबाणी समाप्त आणि लोकसभेच्या निवडणुका; वसंतराव नाईक वाशिम लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.
ऑगस्ट १९७९ : वसंतराव नाईक यांचे सिंगापूरमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन (१८ ऑगस्ट १९७९).
१९८९: तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वसंतराव नाईक यांची जयंती (१ जुलै) ‘कृषी दिन’ म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.